भारतीय रेल्वेने नुकतेच रेल्वेच्या उत्पन्न वाढीसाठी घेतलेला एक निर्णय विशेष स्वागतार्ह म्हणावा लागेल. भारतीय रेल्वेतील सर्व सोयिनींयुक्त घरच्यासारखा अनुभव देणारे दिवाणखान्याचे डब्बे (Saloon Coach) मार्च २०१८पासून सामान्य लोकांसाठी खुले केले गेले.

    ब्रिटिश काळात तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेमध्ये राखीव दिवाणखान्यासारखे डबे वापरण्यात येत होते. स्वातंत्र्यानंतर त्या सोयी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वेमंत्री वापरत होते. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मार्च २०१८पासून असे डबे सर्वसामान्य लोकांना पैसे भरून वापरायला द्यायला सुरुवात केली.

    आयआरसीटीसीचे उपमहाव्यवस्थापक रतीश चंद्रन यांच्या मते रेल्वे सलून बुक करण्याच्या व्यवस्था ऑनलाईन केल्या गेल्या आहेत. रेल्वेचे पहिले सलून जम्मूच्या जुन्या दिल्ली ते कटरा स्टेशनवरुन खाजगी ग्राहकाने बुक केले आहे. या सत्रासाठी आयआरसीटीसीने खासगी ग्राहकांकडून भाड्याचे 2 लाख रुपये घेतले आहेत.

    दिवाणखान्यासारख्या या विशेष डब्यात जेवणाचे, स्वयंपाकघर आणि दोन शयनगृह (bedroom) अशी सोय आहे. सध्या भारतीय रेल्वेकडे असे ३३६ दिवानखाण्याचे डबे (Saloon Coach) आहेत. त्यापैकी ६२ डबे वातानुकूलित आहेत. नुकतेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्यासाठी राखीव असलेले २ असे डबे सर्वसामान्यांना खुले केले आहेत.🤗 

indian railway saloon

    बऱ्याच वेळा रिकामे राहणारे हे डबे आता रेल्वेला अतिरिक्त उत्पन्न तर मिळवून देतीलच शिवाय जे लोक अशी सेवा घेऊ शकतात त्यांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होईल. रेल्वेच्या आर्थिक अंदाजपत्रकाला (budget) अशा निर्णयांनी खारीचा का होईना पण हातभार लागेल. असे छोटे छोटे उपाय यापूर्वी केले असते तर कदाचित आज भारतीय रेल्वे अधिक चांगल्या अवस्थेत असती. असो, या निमित्ताने रेल्वे लोकशाहीच्या मार्गावर आली. ब्रिटिशांच्या अजून एका अत्याचारी वागणुकीतून रेल्वेची सुटका झाली. एक उच्च दर्जाची सेवा सर्वांसाठी खुली झाली.