महाभारतात आणि रामायणात धनुर्विद्येचे एकापेक्षा एक थक्क करणारे प्रकार नमूद केलेयत. TVवर मालिकांमधूनसुद्धा ते काही प्रमाणात दाखवलेत. बाहुबली चित्रपटामध्ये एकाचवेळी तीन बाण सोडण्याचा प्रकारसुद्धा याच प्रकारांमध्ये येतो.

पहिल्यांदा बघितल्यावर “काय भंपकपणा आहे हा? असं कुठं असतं का? असे बाण मारणं शक्यच नाही” असं म्हणणारे काही लोक आपल्यात आहेत.

ज्यांना काही गोष्टी गोऱ्या लोकांनी करून दाखवल्याशिवाय पटत नाहीत. त्यांच्यासाठी हा विडिओ.

इंग्रजांच्या कमकुवत आणि घोकंपट्टीच्या शिक्षण पद्धतीतून घडलेल्या आपल्यातल्या एका पिढीमुळे देशाचं किती नुकसान झालय याची कल्पनाच न केलेली बरी. हीच पद्धती आपल्या धनुर्विद्या शिकणाऱ्या मुलांना शिकवली तर कॉमनवेल्थ आणि ऑलम्पिकमध्ये पदतालिकेत भारत पहिल्या स्थानावर पोहचेल हे नक्की

Leave a Reply

Your email address will not be published.